भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे उद्या कणकवली मतदारसंघाच्या दौऱ्यावर

माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे हे देखील असणारे उपस्थित
कणकवली, देवगड, वैभववाडी तीन ठिकाणी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद
कणकवली विधानसभा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ व निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे कोकण दौऱ्यावर दि .१२ नोव्हेंबर २०२४ रोजी येत आहेत. कणकवली विधानसभेतील निवडणुकीचा आढावा राष्ट्रीय सचिव विनोद तावडे,माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे,जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती भाजपा विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे यांनी दिली.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम,कणकवली तालुका मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे १२ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता कणकवली प्रहार भवन येथे कणकवली तालुका आढावा बैठक होणार आहे.दुपारी ३ वाजता फणसगाव येथे डॉ.सर्वेश नारकर यांच्या घरी बैठक होणार आहे.त्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यालयात तालुक्याची आढावा बैठक ५ वाजता होणार आहे. या बैठकीला सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे,असे मनोज रावराणे यांनी सांगितले.
कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांचा सर्वात मोठा विजय होणार आहे. तशी तयारी भारतीय जनता पार्टी कडून सुरु आहे.भविष्यात आ.नितेश राणे यांच्या विरोधात विरोधी पक्षाचा उमेदवार उभा राहताना विचार करेल, एवढा मोठा विजय नितेश राणेंचा असेल असा विश्वास मनोज रावराणे यांनी व्यक्त केला.