रात्रीचे पियाळी मध्ये पैसे वाटणाऱ्यांना पळवून लावणार

संदेश पारकर यांच्या दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांची भूमिका
संदेश पारकर यांच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
पियाळी बुद्ध विहार येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारादरम्यान बैठक संपन्न झाली. आमच्या समाजाचा निधी लुटणाऱ्या आमदाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि रात्रीचे पैसे वाटणारे ठेकेदारांना आमच्या गावातून पळून लावणार असा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.. आमच्या गावातून जास्तीत जास्त मतदान संदेश पारकर यांनाच करणार आणि विजय मिरवणूक सुद्धा तेवढ्या जोमाने आमच्या गावातून काढणार असा संकल्प करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सुनील कदम, प्रवीण कदम, संजय बंदरकर, राहुल कदम, विकास कदम, शरद नारकर, समीर तेली, विश्वनाथ कदम, संजय कदम, भाऊ कदम, प्रवीण कुडतरकर, रवींद्र गुरव, मधुकर गुरव, बबन नारकर, बाळा नारकर, सिद्धेश राणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.