महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचाराचा आचरा येथे शुभारंभ

महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या आचरा येथील प्रचाराचा शुभारंभ रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून करण्यात आला.यावेळीरामेश्वराला निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे साकडे घालण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष महेश राणे,आचरा सरपंच जेरान फर्नांडिस, निवडणूक निरीक्षक सुजय जाधव,राजन गांवकर, जयप्रकाश परुळेकर, अभिजित सावंत,अभय भोसले, वायंगणी सरपंच रुपेश पाटकर, मुझफ्फर मुजावर,देवस्थान समितीचे संतोष मिराशी, कपिल गुरव,यांसह अवधूत हळदणकर, चंद्रकांत गोलतकर, निलिमा सावंत, दत्ता वराडकर,डॉ प्रमोद कोळंबकर, उदय घाडी,पंकज आचरेकर, किशोर आचरेकर, चंदू कदम, गुरुप्रसाद कांबळी, किशोर हिर्लेकर, विश्वास गावकर, श्रीपाद वायंगणकर, चंदू सावंत,भिकाजी कदम,सारंग, चंद्रशेखर सुतार, मंदार सरजोशी,उदय पुजारे,यांसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.