कणकवली शहरात बिजलीनगर वॉर्ड येथे संदेश पारकर यांच्या प्रचाराचा झंझावती सुरवात

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला घरोघरी जात प्रचार
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा कणकवली शहरातील बिजलीनगर वॉर्ड क्र. १३ येथे झंझावती प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घरोघरी जात बिजलीनगर वॉर्ड येथे प्रचार केला. संदेश पारकर हे भरघोस मताधिक्य मिळवून विजयी होतील. कणकवली शहरातून दीड हजाराचे मताधिक्य घेऊन संदेश पारकर हे विजयी होतील असा ठाम विश्वास यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत प्रतीक्षा साटम, मिनल म्हसकर, वनिता सामंत, माने काकी,अंकिता मोडक, उत्तम सुद्रिक, रवि भंडारे, लक्ष्मण हन्नीकोड व आदी शिवसैनिक उपस्थित होते.