दहशतवाद व पैशांचा माज असणाऱ्या कणकवलीतील आमदारांना पळवून लावा!

माजी खासदार विनायक राऊत यांचे देवगड येथील सभेत जोरदार आरोप
संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ देवगड येथे बैठक घेण्यात आली या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेली दहा वर्षात येथील स्थानिक आमदारांनी काहीच प्रगती केली नाही. नुसता कणकवली नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक सामान्य माणसाच्या हाकेला धावणाऱ्या संदेश पारकर यांच्या पाठीशी रहा. भाजप आणि इतर दोन पक्षांचे सत्ता आली तर लाडकी बहिण योजना बंद होणार. तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर या लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये देणार. आणि महाराष्ट्रातील महिलांना मोफत एसटी सेवा देणार असे उद्गार यावेळी बोलताना माजी खासदार विनायक राऊत साहेब यांनी काढले. मुस्लिम समाजाविरोधात घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या आमदाराला कायमचा घरी बसवा तसेच दहशतवाद आणि पैशाचा माज असणाऱ्या बुटक्या आमदाराला पळून लावा असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश भाई पारकर यांच्या प्रचारार्थ देवगड येथे बैठक संपन्न.. गेली दहा वर्षात येथील स्थानिक आमदारांनी काहीच प्रगती केली नाही.. नुसता कणकवली नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक सामान्य माणसाच्या हाकेला धावणाऱ्या संदेश भाई पारकर यांच्या पाठीशी राहा .. भाजप आणि इतर दोन पक्षांचे सत्ता आली तर लाडकी बहिण योजना बंद होणार, तर महाविकास आघाडीची सत्ता आली तर या लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये देणार आणि महाराष्ट्रातील महिलांना मोफत एसटी सेवा देणार असे उद्गार यावेळी बोलताना माजी खासदार विनायक राऊत साहेब यांनी काढले. मुस्लिम समाजाविरोधात घाणेरडे वक्तव्य करणाऱ्या आमदाराला कायमचा घरी बसवा तसेच दहशतवाद आणि पैशाचा माज असणाऱ्या आमदाराला पळून लावा असे वक्तव्य राऊत यांनी काढले. यावेळी त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजीद बटवाले, बंडू जोशी, अनिल राणे, मिलिंद साटम, जयेश नर, हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर, वर्षा पवार, निनाद देशपांडे, फरीद काझी, गणेश गावकर आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.