पडेल मधील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

माजी खासदार विनायक राऊत यांनी केले पक्षात स्वागत

जामसांडे, शिरगाव मधीलही अनेक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात

पडेल गावातील शिंदे गटातील कार्यकर्त्या प्रियांका अनंत तांबे, प्रीती वाडेकर, प्रगती वाडेकर, मृणाली कोळबकर यांच्यासह अनेक महिलांनी माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश. जामसंडे गावातील जयश्री भुवळ, पूजा लिमये, दीक्षा सोहणी, आणी स्थानिक महिलांनी केला प्रवेश . तसेच शिरगाव आंबे खोल गावातील निलेश कदम आणि शिरगाव बौद्ध वाडी येथील सुरेश जाधव अभिषेक कदम यांच्यासह 30 ते 35 ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात केला प्रवेश.. यावेळी त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण वेंगुर्लेकर, तालुका अध्यक्ष उमेश कुलकर्णी, मजिद बटवाले, बंडू जोशी, अनिल राणे, मिलिंद साटम, जयेश नर, हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर, वर्षा पवार, निनाद देशपांडे, फरीद काझी, गणेश गावकर आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!