कणकवली शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम

उस्फुर्तपणे मतदान करण्याचे आवाहन
268 कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने केंदीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिका-यांच्या सूचाना प्राप्त आहेत. त्या अनुषंगाने कणकवली शहरात नगरपंचायत तर्फे मतदारांसाठी मतदार हस्ताक्षर अभियान व सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. स्विप कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये दि.24/10/2024 पासून मतदान शपथ, पथ नाट्य, मतदान जनजागृती रॅली, हे उपक्रम, तसेच मतदार सेल्फी पॉईंट व मतदार हस्ताक्षर अभियान शहरामध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आले आहेत. सदर जनजागृती कार्यक्रमाकरीता बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शविला असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नगरपंचायतीतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.





