कणकवली मतदारसंघातील निष्क्रिय आमदारांमुळेच आंबा, काजू बागायतदारांचे प्रश्न रखडले

देवगड दौऱ्यात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा घणाघात
ईळये घाडीवाडी येथील दीपक कदम यांच्या घरी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी सामान्य जनतेसाठी तळमळणारा उमेदवार संदेश पारकर यांना बहुमताने पाठिंबा देणार. गेल्या दहा वर्षात येथील आमदार नितेश राणे यांनी स्थानिक नागरिकांना कोणत्याही प्रकारचा रोजगार दिला नाही. निवडणूक आली की रोजगार देणार अशा भुलथापा मारल्या अशा उमेदवाराला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा निश्चय करण्यात आला. येथील आंबा उत्पादक मच्छीमार काजू व्यापारी यांच्यासाठी येथील आमदार राणे यांनी आतापर्यंत काहीच केलं नाही. फक्त बढाया मारल्या. अशा लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे राहण्यापेक्षा सामान्य जनतेच्या हाकेला व गोरगरिबांना मदत करणाऱ्या संदेश पारकर सारख्या उमेदवाराला मोठी ताकद देणार. तसेच प्रत्येक निवडणुकीत होणारी घराणेशाही येथून नष्ट करणार आणि मुसलमान समाजावर बोलणाऱ्या आमदाराला यावर्षी धडा शिकवणार असा निश्चय येथील ग्रामस्थांनी केला. आमच्या प्रभागातून शंभर टक्के मतदान संदेश पारकर यांनाच करणार असा निश्चय करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत दीपक कदम, श्रीकृष्ण कदम, भिकाजी परब, संतोष घाडी, अशोक कदम, उमेश जाधव, रवींद्र कासले आणि तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.




