दहा वर्ष भूलथापा ऐकण्यातच गेली आता कणकवली मतदारसंघात बदल हवा आमदार नवा!

देवगड येथील दौऱ्यात संदेश पारकर यांचे मतदारांना आवाहन
संदेश पारकर यांचे घरोघरी उत्साहात स्वागत
देवगड तालुक्यातील पडेल, वानिवडे आणि गोवळ या भागात महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांना उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा वर्षात येथील आमदार नितेश राणे यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. आणि गेल्या दहा वर्षात या भागातील तरुणांना रोजगार सुद्धा दिला नाही. असा आरोप या भागातील ग्रामस्थांनी केल्याची माहिती संदेश पारकर यांनी दिली. इलेक्शन पुरतं भूलथापां मारणाऱ्या या आमदार नितेश राणे यांना या निवडणुकीला आपल्या भागातून हद्दपार केल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असे उद्गार संदेश पारकर यांनी याप्रसंगी काढले. कायम जनतेच्या एका हाकेला धावून येणाऱ्या संदेश पारकर यांना आपल्या प्रभागातून जास्तीत जास्त मतदान करणार आणि घराणेशाही असलेल्या आमदारांना घरी बसवणार असा संकल्प या दोन गावातील लोकांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत अरविंद लाड, दिनेश लाड, सचिन लाड, राजू लाड, साहिल लाड, प्रकाश लाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश पारकर यांनी भेट दिली जनतेशी संवाद साधला. या दोन्ही गावात संदेश पारकर यांना जास्तीत जास्त मदत करणार आणि येथील स्थानिक आमदाराना घरी बसवणार असे उदगार येथील नागरिकांनी काढले. अशी माहिती श्री पारकर यांनी दिली. येत्या विधानसभेत येथील स्थानिक आमदार नितेश राणे यांना येथून हद्दपार करणार आणि हे दोन्ही गाव 100% संदेश पारकर यांच्या पाठीशी राहणार असा निश्चय करण्यात आला. यावेळी गंगाराम आहिर, शंकर महाडिक, अमोल गायकवाड, राजू नवंलू, बाप्पा लोके, नारायण मुबरकर, कालिदास तोडणकर, विठू प्रभू, घनश्याम कोयडे, मनोज तारी, बंटी कोयडें, अभिषेक ढोके, हेमंत कोयडें, भगवान कोयडें, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




