शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते गौरीशंकर खोत यांना मातृशोक

कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथील सुमित्रा पांडुरंग खोत (वय ९४) यांचे आज पहाटे २.४५ वा. वृध्दपकाळाने निधन झाले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली नातवंडे, पतवंडे, सुना, जावई असा मोठा परिवार आहे. आज दुपारी १२.०० वा. राहत्या नांदगाव वाघाची वाडी येथून अंत्ययात्रा निघणार आहे.

error: Content is protected !!