खारेपाटण गुरववाडी येथील तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश

विधानसभा संपर्क प्रमुख-सतीश सावंत व जि.प.संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या उपस्थितीत करण्यात आला पक्षप्रवेश
कणकवली तालुक्यातील खारेपाटण गुरव वाडी येथील तरुणांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.विधानसभा संपर्क प्रमुख -सतीश सावंत व जि.प.संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या उपस्थितीत तरुणांनी हा पक्षप्रवेश केला आहे .यामध्ये संदेश घाडी, गणेश गुरव, अक्षय गुरव, अभिषेक गुरव, राजा गुरव, नितेश गुरव समीर गुरव आदि युवकांनी पक्षप्रवेश केला.
आत्ताच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये हा तरुणांनी केलेला प्रवेश नक्कीच उल्लेखनीय आहे.या पक्षप्रवेशाच्या वेळी युवा सेना विभाग प्रमुख -निखिल गुरव,तेजस राऊत, हर्षद राऊत, दिनेश खांडेकर, समीर गुरव आदि उपस्थित होते.





