मतदारसंघातील दहशतवाद संदेश पारकरच मोडीत काढू शकतात!

घराणेशाही मोडीत काढण्यासाठी संदेश पारकर यांच्याच पाठीशी ठाम राहा

देवगड तालुका दौऱ्यात जनतेने मांडल्या भूमिका

महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा देवगड तालुक्यात झंजावाती प्रचार दौरा सुरू असून, देवगड तालुक्यातील वाघोटन, सौंदळ गावी भेटी देत जनतेशी संवाद साधला. वाघोटन येथे फरीद काझी आणि सौंदळ गाव प्रमुख आबा ताम्हणकर यांच्या घरी भेट देत चर्चा केली. यावेळी वाघोटन आणि सौंदळ या गावाचा विकास संदेश पारकर हेच करू शकतात व येथील दहशतवाद पूर्ण नाहीसा करू शकतात त्यामुळे या गावातून शंभर टक्के मतदान संदेश पारकर यांना करण्याचा निर्धार या गावातील जमलेल्या लोकांनी केला. तसेच येथील घराणेशाही ही मुळापासून नष्ट संदेश पारकर हेच करू शकतात असे सौंदळ येथील गावप्रमुख यांनी बोलून दाखवले. त्यामुळे पुढचा आमदार संदेश पारकर असणार आणि या दोन गावातून त्यांना भरघोस मतदान करणार असा निश्चय या जमलेल्या लोकांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत फरीद काझी, पांडुरंग गोठणकर, संदीप दांडेकर, नामदेव गुरव, दिलीप गुरव, सचिन परब, सुधीर इयकर, इकबाल मुल्ला, निसार काझी, विनायक ठुकरुल, अजय पुजारे,, महेंद्र पुजारे,, सहदेव पुजारे ,संतोष ठुकरुल, संदीप डोंगरकर, नितेश गुरव, दीपक पातले, अरुण पातले, चंद्रकांत गुरव, मयूर गुरव, लवू पातले, विनायक डोंगरे, संजय गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!