भुईबावडा ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर फोंडके यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

हेत माजी सरपंच रामचंद्र फोंडके यांचाही भाजपात प्रवेश
आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे केले पक्षात स्वागत
भुईबावडा पंचायत समितीचे ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख, व हेत गावचे पदाधिकारी ज्ञानेश्वर शांताराम फोंडके, हेत माजी सरपंच रामचंद्र फोंडके, ऋषिकेश फोंडके, सुरेश फोंडके यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.
यावेळी भाजपा पदाधिकारी नासीर काझी, माजी उपसभापती भालचंद्र साठे, हेत माजी सरपंच किशोर कांबळे, उपळे माजी सरपंच देवानंद पालांडे व पदाधिकारी उपस्थित होते.





