हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आमदार नितेश राणेंनी केला उमेदवारी अर्ज दाखल

कणकवलीत उच्चांकी गर्दीची रॅली
आमदार नितेश राणे पुन्हा आमदार होणार कार्यकर्त्यांचा निर्धार
कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे ते तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहे ,त्यानिमित्त कणकवली गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली काढण्यात आली आहे.या रॅलीने आम.नितेश राणे जावून थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. श्रीदेव गांगो मंदिरात देवतेला श्रीफळ देऊन रॅली ची सुरुवात करण्यात आली. भाजप नेते नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर, श्री निलेश राणे, सौ नीलम ताई राणे सौ नंदिता राणे सौ प्रियंका राणे कुमार अभिराज राणे कुमार निमित राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, दत्ता सामंत यांच्या हजारो प्रमुख पदाधिकारी आणि जनसागराच्या उपस्थितीत ही रॅली रवाना झाली. उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात रॅली दाखल झाल्यावर उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात जाहीर सभा घेण्यात आली. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण अर्पण करत अभिवादन करण्यात आले.





