भिरवंडे बौद्धवाडी येथील युवक महिला व ग्रामस्थांचा भाजपात पक्षप्रवेश

भाजपा नाटळ- सांगवे विभागीय कार्यालयात संदेश सावंत यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

कणकवली मतदार संघांचे विधानसभा निवडणुकीचे भाजपा उमेदवार नितेश राणे आणि माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या विकास कामांच्या कार्याने प्रेरित होऊन भिरवंडे बौद्धवाडी येथील युवक महिला व ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केला कनेडी बाजारपेठ येथील भाजप च्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला असून प्रवेश कर्त्यांचे संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी स्वागत केले यावेळी प्रशांत कांबळे, मुकुंद कांबळे, स्वप्नील जाधव, राजू जाधव, विनायक कांबळे, सुशील कांबळे, स्वप्ना कांबळे, शोभना पवार, शौर्या जाधव, प्राची कांबळे, स्नेहा पवार, लक्ष्मीकांत कांबळे आदी ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केला, कनेडी दशक्रोशीतील गावातील बौद्धवाडी मध्ये आम नितेश राणे व गोट्या सावंत यांनी केलेली विकासकामे पाहुण आम्ही हा पक्ष प्रवेश केला असल्याचे या ग्रामस्थांनी सांगितले प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे गोटया सावंत यांनी सांगितले यावेळी सांगवे सरपंच संजय उर्फ बाबु सावंत,भरत गावकर भिरवंडे शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे,मिलिंद बोभाटे आदी उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!