राजन तेली यांना बबन साळगावकरांचा जाहीर पाठिंबा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे आपली नेमकी भूमिका काय घेणार? हे प्रश्नचिन्ह असताना त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आपले मित्र राजन तेली यांना आपला जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते स्वतः उतरणार आहे. श्री. साळगावकर हे विधानसभेच्या तोंडावर ठाकरे सेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. तशी कार्यकर्त्यांची सुध्दा इच्छा आहे. हे प्रश्नचिन्ह कायम असताना त्यांनी आज राजन तेली यांना पाठिंबा जाहीर केला आहे.





