दिवाळी पुर्वी निवृत्तीवेतन धारकांना बिनव्याजी अॅडव्हान्स देण्याची जिल्हा बँकेकडे मागणी

आचरा–अर्जुन बापर्डेकर
दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्गाच्या निवृत्तीवेतन धारकांना मिळाले नाहीतर निवृत्तीवेतना एवढा बिनव्याजी अॅडव्हान्स देण्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांना निवेदनाद्वारे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग यांच्या तर्फे मागणी करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा बँक मुख्याधिकारी गावडे यांच्या कडे देण्यात आले.
या बाबत दळवी यांच्या कडून प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यामुळे ज्यांची निवृत्तीवेतनाची बॅकखाती सिंधुदुर्ग बॅंकेत आहेत त्याना .28 पासून निवृत्तीवेतन अॅडव्हान्स मिळूशकेल असे सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग यांच्या कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाने दि.25 आक्टोंबर पुर्वी निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतलेला आहे.परंतु अशा निर्णयाची अंमलबजावणी मुदतीत न झाल्यास ऐन दिवाळी सणात त्याचा फटका निवृत्ती वेतन धारकांना बसू शकतो. यासाठीसेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग यांच्या तर्फे जिल्हा बँक मुख्याधिकारी गावडे यांना निवेदन देण्यात आले होते. यावेळी
सेवानिवृत्त ग्रामसेवक संवर्ग महासंघ सिंधुदुर्ग
.जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळकृष्ण राणे ,उपाध्यक्ष हनुमंत प्रभू, सचिव प्रकाश राणे आदी उपस्थित होते.





