अखेर दत्ता सामंत निलेश राणे यांचे मनोमिलन

गेले काही दिवस दत्ता सामंत सक्रिय राजकारणापासून होते दूर
राणे कुटुंबीयांसोबत दत्ता सामतांचा फोटो माध्यमांमध्ये व्हायरल
अखेर गेल्या अनेक महिन्यांच्या उलट सुलट चर्चेनंतर खासदार नारायण राणे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे दत्ता सामंत यांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे व नीलम राणे यांची भेट घेतली. यावेळी कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार निलेश राणे यांच्या सोबत पाठीवर हात ठेवलेला फोटो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील भविष्यातील संदेश देणारा ठरणार असल्याची चर्चा आहे. या महत्त्वपूर्ण भेटी प्रसंगी आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित होते. मध्यंतरी गेले काही दिवस दत्ता सामंत हे नाराज असल्याच्या चर्चा माध्यमांमधून होत्या. मात्र याबाबत कोणतीही उघड प्रतिक्रिया दिली जात नव्हती. दरम्यान कुडाळ मालवण मतदार संघात माजी खासदार निलेश राणे हे उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे यावेळी कोणतीही कसूर न ठेवता निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने राणे कुटुंबीय मैदानात उतरले आहे. त्याचा एक भाग म्हणून गेले काही दिवस दुरावलेले दत्ता सामंत पुन्हा एकदा आज राणेंना भेटल्याने व त्यात करून उमेदवार असलेल्या निलेश राणेंनी दत्ता सामंत यांच्या पाठीवर हात ठेवलेला फोटो व्हायरल झाल्याने निलेश राणे सोबत दत्ता सामंतांचे मनोमिलन झाल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.