अन्यथा नितेश राणे यांचा पूर्व इतिहास समोर आणावा लागेल!

माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आमदार नितेश राणेना इशारा

आमदार नितेश राणे यांनी पूर्व इतिहास समजून घेऊनच टीका करण्याचे धाडस करावे. मी राणेंना सोडून गेलो असा उल्लेख करणाऱ्या नितेश राणे यांनी त्यावेळी राजकारण समजण्याएवढे आपले वय तरी होते का? हे प्रथम पहावे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
मी बाळासाहेब ठाकरे यांचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून कायमच होतो. मात्र आमदार राणे यांचे वडील नारायण राणे यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली होती. नंतरच्या कालावधीत मी शिवसेना सोडली असली तरीही मी बाळासाहेब ठाकरे यांचाच शिवसैनिक म्हणून कायमच राहिलो.
राजकारणातील पूर्व इतिहास माहिती नसताना आमच्यावर टीका करण्याचे असे प्रयत्न केल्यास संपूर्ण पूर्व इतिहास समोर आणावा लागेल. मला कोणीही शिवसेनेतून हाकललेले नाही. मी त्यावेळी स्वतःहून शिवसेना सोडली होती. मात्र नारायण राणे मुख्यमंत्री असताना पासूनच मी एकाच पक्षात असलो तरीही अंतर राखून होतो. अशा स्थितीत माझ्या बाबत बोलताना विचारपूर्वकच वक्तव्य करावे. अन्यथा पूर्व इतिहास आणि माझे प्रतिज्ञापत्र जनतेसमोर आणावे लागेल असे श्री. उपरकर यांनी म्हटले आहे.

कणकवली प्रतिनिधी

Leave a Reply

error: Content is protected !!