दिविजा वृद्धाश्रम असलदे मार्फत विद्यामंदिर प्रशालेत उटणे वाटप

मुख्याध्यापक पी जे कांबळे यांनी केले कौतुक

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत दिविजा वृद्धाश्रम असलदे संस्थे मार्फत वृद्धांनी तयार केलेले उटणे प्रशालेत विद्यार्थांना दिवाळी सणानिमित्त वाटण्यात आले दिवाळी सण महाराष्ट्रातील मोठा उत्सव असतो विद्यार्थांना भारतीय सणांची परंपरा माहिती व्हावी सण समारंभातून संस्कृतींचे मार्गदर्शन मिळावे तसेच वृद्धांचा सन्मान राखावा या उद्देशाने दिविजा वृद्धांश्रमातील प्रतिनिधी प्रशालेत येऊन सर्व विद्यार्थांना पारंपरिक स्वतः तयार केलेले आयुर्वेदिक उटणे वाटून कृतज्ञता निर्माण केली . नव्या पिढीला संस्कारांची व सणांची माहिती या निमित्ताने करण्यात आली . या वेळी कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी सर्व विद्यार्थांना जेष्ठ नागरिक व वृद्ध नागरिक यांचा घराघरात आदर आपुली व प्रेम कसे राखावे या विषयी मार्गदर्शन केले मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले व दिविजा वृद्धाश्रम संस्थेचे आभार व्यक्त केले पर्यवेक्षिका वृषाली जाधव जेष्ठ शिक्षक अच्युतराव वणवे यांनी शुभेच्छा दिल्या . यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

Leave a Reply

error: Content is protected !!