अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भात शेतीचे तातडीने पंचनामे करा- पप्पू ब्रम्हदंडे, सरपंच

जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्याचा हाता तोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला जात आहे.यामुळे जिल्ह्यातील भात शेती करणारा शेतकरी चिंतातुर झाला असून ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान झाले आहे.त्या शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा.अशी मागणी कुरांगवणे – बेर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे यांनी नुकतीच कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
कुरांगावने सरपंच व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलेले श्री पप्पू ब्रम्हदंडे यांनी नुकतीच कणकवली तहसीलदार यांची कणकवली येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.या निवेदनात त्यांनी ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले अशा सर्व शेतकऱ्यांचे प्रशासनाच्या वतीने तातडीने पंचनामे करून त्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.अशी मागणी कुरंगवणे सरपंच श्री पप्पू ब्रम्हदंडे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांचेकडे केली आहे.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

Leave a Reply

error: Content is protected !!