जावयाची सासूला शिवीगाळ व मारहाण

कसई धाटवाडी येथील घटना ;जावयावर गुन्हा दाखल

✅प्रतिनिधी l दोडामार्ग
घरात घुसून शिवीगाळ करत हाताच्या थापटाने मारहाण करून सासूला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जावयाविरुद्ध दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनेश मधुसूदन नाईक (वय – ४१ वर्षे, रा.मळेवाड ता. सावंतवाडी सध्या रा. भोसले कॉलनी, दोडामार्ग) असे त्याचे नाव आहे.पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी ही माहिती दिली. पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी मनेश मधुसूदन नाईक हा तक्रारदार गुणवंती तुकाराम साळकर (वय -८० वर्षे,रा . कसई धाटवाडी ता. दोडामार्ग) यांचा जावई असून तो सोमवारी १४ ऑक्टोंबर रोजी सकाळी फिर्यादी गुववंती साळकर यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेला होता. मात्र, तक्रारदार यांनी त्याला पैसे दिले नाही. तो राग मनात धरून मनेश नाईक हा रात्री पुन्हा ११:३० वाजता आला. यावेळी त्याने घरात घुसून सासूला शिवीगाळ करून, हाताच्या थापटाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मधुसूदन नाईक याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला .

Leave a Reply

error: Content is protected !!