फोंडाघाट चेकपोस्टवर 10 लाखाहुन अधिक रोकड जप्त

चेकपोस्टवर कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी नितीन बनसोडे यांची कारवाई

यापूर्वी देखील फोंडाघाट चेकपोस्टवर श्री बनसोडे यांना रोकड जप्त करण्याची केली होती कारवाई

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पैशांच्या वापरावर करडी नजर

आचारसंहिता कालावधीमध्ये फोडाघाट चेक पोस्टवर कार्यरत असणाऱ्या पोलिसांकडून वाहनांच्या तपासणी दरम्यान कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारमधील तब्बल 10 लाखाहुन अधिक रोख रक्कम जप्त केली आहे. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम ही कोल्हापूर येथील एका व्यापाऱ्याची सळी व्यापाऱ्याची असल्याची बाब समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माल घातलेल्या कडून वसूल करून घेतलेली रक्कम कोल्हापूर येथे नेत असताना चेकपोस्टवर कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी नितीन बनसोडे व उद्देश कदम यांनी ही कारवाई केली. दरम्यान यापूर्वी देखील नितीन बनसोडे यांनी अशी कारवाई केली असून आता ही रक्कम तहसीलदार यांच्याकडे जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रां कडून देण्यात आली. मात्र आचारसहिता काळात अशा प्रकारे रक्कम पकडली गेल्याने आता येत्या काळात पोलिसांची रोख रकमेच्या वाहतुकीवर व वापरावर करडी नजर असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिगंबर वालावलकर/ कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!