सकल मराठा समाजाच्या वतीने महिला बचत गटाच्या प्रतिनिधी जागृती पोटले यांचा सत्कार

भारत सरकारच्या वतीने अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय नवी दिल्ली येथे भरविण्यात आलेल्या “वर्ल्ड फूड इंडिया – २०२४ प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील श्री समर्थ महिला बचत गटाच्या प्रतिनिधी सौ.जागृती जनार्दन पोटले या महिला भगिनीची निवड होऊन तिला प्रदर्शनात कोकणी पदार्थाचा स्टॉल लावण्याची संधी मिळाली होती.त्यामुळे येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने नुकताच सौ जागृती पोटले यांचा सत्कार अध्यक्ष श्री रमाकांत राऊत यांच्या शूभहस्ते करण्यात आला.
यावेळी खारेपाटण येथील सकल मराठा समाज बांधव संघटनेचे अध्यक्ष श्री रमाकांत राऊत,उपाध्यक्ष अरविंद कर्ले,सचिव – ऋषिकेश जाधव यांसह कोअर कमिटी सदस्य श्री चंद्रमोहन शिंदे, रघुवीर राणे,सुनील कर्ले,चंद्रकांत मण्यार,किरण कर्ले,समीर मण्यार आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महिला बचत गटाच्या प्रतिनिधी तसेच मराठा भगिनी सौ जागृती पोटले यांनी समाजाबरोबर आपल्या गावचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सौ जागृती पोटले हीचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मान पत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

Leave a Reply

error: Content is protected !!