साहेब, तुमचा पक्षावर भरवसा नाही का ? अशी अवस्था माजी आमदार राजन तेली यांची झाली आहे- हर्षद डेरे

सावंतवाडी : साहेब, तुमचा पक्षावर भरवसा नाही का ? अशी अवस्था माजी आमदार राजन तेली यांची झाली आहे. महायुतीमधला ते मिठाचा खडा आहे हे अखेर सिद्ध झाले आहे. म्हणूनच, त्यांच्या मेळाव्याला भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहीले नाहीत. नाहक दीपकभाई केसरकर साहेबांवर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम राजन तेली करत आहेत.

आपला निर्णय झाला आहे पण तुम्ही पक्ष सोडू नका असे राजन तेली आजच्या बैठकीत बोलून गेले. याचा अर्थ पक्ष बदलायची वेळ झाली हे निश्चित झाले आहे. राजन तेली यांच्या तोंडूनच ते बाहेर पडले आहे. ना घरका, ना घाटका अशी अवस्था झाल्याने तेली अस्वस्थ झाले आहेत. यातूनच दीपकभाई केसरकर यांच्याविषयी ते बेताल वक्तव्य करत आहेत. वेळागर येथील प्रकारानंतर झारीतील शुक्राचार्य कोण आहे हे भाजप श्रेष्ठींना देखील कळून चुकले आहे. दोनवेळा जनतेन तेली यांना त्यांची जागा दाखवून दिला आहे. पुन्हा तिसऱ्यांदा त्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असे मत युवासेना जिल्हाप्रमुख श्री.हर्षद डेरे यांनी व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!