चिंदर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

पालकरवाडी पायवाट, मारुती मंदिर रस्ता, पालकरवाडी-भटवाडी स्मशानभूमी, कोंडवाडी गणेश मंदिर रस्ता या कामांचा समावेश

आचरा- अर्जुन बापर्डेकर
चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोग, नागरिक सुविधा, जिल्हा नियोजन, ग्रामपंचायत विकास निधी मधून मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे भूमीपूजन आज करण्यात आले.

चिंदर पालकरवाडी अनंत आचरेकर घर ते महेश गोलतकर घर पायवाटेचे भूमीपूजन चंद्रशेखर पालकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तर पालकरवाडी- लब्देवाडी मारुती मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण रस्त्याचे भूमी पूजन भाजप चिंदर पंचायत समिती प्रभारी प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

चिंदर पालकरवाडी-भटवाडी स्मशान भूमी नूतनीकरण कामाचे भूमीपूजन ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर तर कोंडवाडी गणेश मंदिर रस्ता खडीकरण-डांबरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन सरपंच नम्रता महंकाळ-पालकर व दत्ताराम अपराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

   यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, चेअरमन देवेंद्र हडकर,  व्हॉइस चेअरमन सुनिल पवार, दिगंबर जाधव, सहदेव सावंत, शिशिर पालकर, विजय गोलतकर, नित्या मेस्त्री, भटवाडी पोलीस पाटील मंगेश नाटेकर, शंकर अपराज, शांताराम अपराज, विराज सावंत, महादेव सावंत, दादा अपराज, नवनाथ पवार आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!