निवडणुका नसतानाही केसरकरांकडून निधी

गणेशप्रसाद गवस ;तालुक्याचा विकास हेच ध्येय

✅प्रतिनिधी l दोडामार्ग
निवडणुका जवळ आल्या की विकासकामे करायची असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर करत नाहीत.निवडणुका नसतानाही ते सातत्याने निधी देत असतात. गेल्या पाच वर्षात प्रत्येक गावात पाहिजे त्या विकास कामांसाठी केसरकर यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. दोडामार्ग तालुक्याचा विकास व्हावा हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ठ आहे, असे शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले .
शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तालुक्यातील विविध गावांत विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गवस बोलत होते.
ते म्हणाले,एकही महामार्ग दोडामार्ग तालुक्यातून गेलेला नाही. मात्र,होऊ घातलेला सह्याद्री महामार्ग हा आपल्या तालुक्यातून जाणार आहे. यासाठीही मंत्री केसरकर यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत मंत्री केसरकर यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी भाजपचे चंदू मळीक, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष दीक्षा महालकर, शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर, रामदास मेस्त्री, हर्षद सावंत, मायकल लोबो, दादा देसाई, तिलकांचन देसाई, पिकुळे सरपंच आप्पा गवस, संदेश गवस, संदीप गवस, रत्नकांत कर्पे, विनायक शेट्ये, शशिकांत गवस यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या कामांचे झाले भूमिपूजन…..

पिकुळे ते तळेखोल रस्ता – १. ८ किमी . – १ कोटी ९५ लाख रुपये, पिकुळे तिठा ते उसप रस्ता – ३.१० किमी – २ कोटी १६ लाख रुपये, साटेली भेडशी – खानयाळे – शिरंगे पुनर्वसन रस्ता – ३.६१ किमी – २ कोटी ७० लाख, मांगेली फणसवाडी देऊळवाडी रस्ता १.५० किमी – २ कोटी ६ लाख रुपये, मांगेली ते फणसवाडी रस्ता ६.५० किमी – ९ कोटी ९९ लाख रुपये, तेरवण मेढे ते मेढे रस्ता ६. २५ किमी रस्ता – ८ कोटी ८४ लाख रुपये, तिलारी घोटगेवाडी मोर्ले ते पारगड रस्ता ४ कोटी रुपये

error: Content is protected !!