चिंदर गावच्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण पायाभूत सुविधा विकास कामालापाच कोटी निधीस प्रशासकीय मान्यता

भाजप तर्फे जल्लोष
आचरा -अर्जुन बापर्डेकर

चिंदर गावाच्या विकासाचे पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण पाऊल असलेल्या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण करणे, पायाभूत सुविधानचा विकास करणे या कामासाठी आवश्यक पाच कोटी निधीस प्रशासकीय मान्यता मिळताच भाजप आणि चिंदर ग्रामस्थांतर्फे चिंदर तलाव येथे फटाके वाजवून आनंद साजरा करत जल्लोष केला गेला.
मंगळवारी आकारी ब्राह्मण देवास बारापाच मानकरी नारायण पाताडे यांच्या वतीने मंजूर काम चांगल्या प्रकारे होवून गावाच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी साकडे घालण्यात आले.
या कामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2024-25 अंतर्गत 5 कोटी निधी मंजूर झाला आहे.

   यावेळी बोलताना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी  गावच्या विकासातील  महत्व पूर्ण असे तलाव सुशोभीकरण काम मंजूर झाल्या मुळे पर्यटन दृष्टीने चिंदर गावचे महत्व वाढणार असल्याचे मत व्यक्त केले.तसेच यासाठी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, भाजप नेते निलेश राणे , अनिकेत पटवर्धन यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्यामुळे  धोंडी चिंदरकर यांनी यावेळी त्यांचे आभार व्यक्त केले. 

यावेळी त्यांच्या सोबत भाजप नेते संतोष कोदे, मालवण शहर प्रभारी संतोष गावकर, भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, चिंदर पंचायत समिती प्रभारी प्रकाश मेस्त्री, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष मंगेश गांवकर, उपसरपंच दिपक सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, महेंद्र मांजरेकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, बूथ अध्यक्ष अरविंद घाडी, दिगंबर जाधव, हिमाली अमरे, चंद्रशेखर पालकर, बंटी भोंवर, रोहित पाटील, प्रकाश परब, ब्रम्हानंद तावडे, भाई अपराज, गिरीश पवार, अमोल साटम, रवि घागरे, शेखर पाताडे, शालीवाहन गोलतकर, सागर परब, रमेश घाडी, तेजस घाडी, पाटणकर, विवेक खांडेकर, विश्राम माळगावकर, पवार, चिले यांसहअन्य मान्यवर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!