रस्त्यावर भटकणारी गुरे आणि त्यांना धडकून होणारे अपघात या दोघांच्या चिंतेतून जन्माला आलेली दोडामार्गची गोशाळा!
श्री विशाल परब नावाच्या एका युवा नेतृत्वाच्या संवेदनशील संकल्पनेतून निघाला मार्ग, वाढदिवसादिवशीच केले अनोख्या प्रकल्पाचे उद्घाटन!
प्रश्न अनेक असतात. त्याबाबत उलटसुलट चर्चाही अनेकवेळा होत असतात. एकमेकांवर बोटे दाखवत अनेक अशा अनेक चर्चांचा समारोप होतो. परंतु एखाद्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहणे, त्यावर विचार करणे आणि त्यावर तोडगा काढून विषय संपवणे ही खासियत ज्या युवा नेतृत्वाकडे आहे, त्याचे नाव विशाल प्रभाकर परब! अल्पावधीतच या युवा नेतृत्वाची तरुण वर्गाची जी प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे, त्यामागे आहे तो एखादा विषय जाणून घेऊन तो सोडवण्याची धमक. जनरेशन नेक्स्ट ही आश्वासनांवर नव्हे तर कृतीवर विश्वास ठेवणारी आहे आणि म्हणूनच श्री विशाल परब आज जनमानसात लोकप्रिय होताना दिसत आहेत.
आपण पाहतो की आज रस्त्यावर अनेक गुरे भटकताना दिसतात. अचानक वाहनांच्या समोर येणाऱ्या गुरांमुळे जीवघेणे अपघात होतात. आजवर शेकडो लोक अशा अपघातात मृत्युमुखी पडले आहेत आणि त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. अनेक वर्ष हा प्रश्न समाजाला त्रासदायक ठरत आला होता.
परंतु यावर उत्तर शोधण्याचे काम हे विशाल परब यांनी केले. दोडामार्ग मधील भाजपाचे पदाधिकारी, तरुण नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, गोवंश रक्षणाचे काम करणारी युवा फळी या सगळ्यांना त्यांनी एकत्र आणले. रस्त्यावर भटकणाऱ्या गुरांना आश्रय देणारी एक गोशाळा स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची जबाबदारी श्री विशाल परब यांनी घेतली. श्री राजेश फुलारी व श्रीराम म्हैसकर यांनी आपली जमीन या उपक्रमासाठी दिली. अल्पावधीतच सगळ्यांच्या एकजुटीतून लोकांच्या जीवन मरणाचा एक प्रश्न सुटला. प्रश्नाला उत्तर मिळाले.
श्री विशाल परब यांच्या दूरदृष्टीमुळे सावंतवाडी मतदार संघातील गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन प्रभावीपणे होण्यासाठी एक मार्ग खुला झाला आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी होऊन गोमातांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत पायाभरणी या प्रकल्पामधून केली गेली आहे.
आज श्रीमद वासुदेवानंद गोरक्ष समिती दोडामार्ग यांच्या पुढाकाराने दोडामार्ग धाटवाडी येथे भव्य गोमाता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो महिला आणि नागरिकांच्या उपस्थिती गोव्यातील श्री आपटे गुरुजींच्या हस्ते शास्त्रशुद्ध पद्धतीने गोपूजन करून गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
श्री विशाल परब व सौ वेदिका परब यांनी गोपूजन करत या अभिनव प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी ॲड.अनिल निरवडेकर, श्री रवी जी परब, श्री.दिलीप भालेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष श्री चेतन चव्हाण, श्री नितीन मणेरीकर, देवेंद्र शेटकर, सुहास गोवेकर, रामचंद्र मणेरीकर, रंगनाथ गवस, राजेश फुलारी, दयानंद धाऊसकर, निलेश कोरेगांवकर, निलेश साळगांवकर, मिलिंद नाईक, बाबुराव धुरी ,राज बोंद्रे, सिद्धनाथ नाटेकर, राकेश गवंड, राकेश भोळे, प्रकाश गवस, सौ सुकन्या पनवेलकर, सौ संध्या प्रसादी, सौ चैत्राली भोळे, सौ शालन साळगावकर, सौ श्रुती देसाई, सौ समिता गवस, सौ आकांक्षा गवस,सौ सुलक्षा गवस, कु हर्षदा पुरोहित, कु दिया भोळे यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.