इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी रमले मराठी वाचनात.
आयडियल स्कूल चा आगळावेगळा उपक्रम.
कणकवली/मयूर ठाकूर
‘वाचाल तर वाचाल’ वाचन संस्कृती टिकवणे आज काळाची गरज आहे हेच ब्रीद वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासाठीच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस अर्थातच ” “वाचन प्रेरणा दिन” आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे आणि कणकवली नगर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयडियल इंग्लिश स्कूलच्या सभागृहात नुकताच पार पडला. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल सल्लागार श्री.डी.पी तानावडे सर मुख्याध्यापिका सौ अर्चना शेखर देसाई मॅडम,नगर वाचनालयाचे ग्रंथपाल श्री राजन ठाकूर सह ग्रंथपाल आचार्य मॅडम श्री.वळंजु सर आयडियल स्कूल चे सहशिक्षक श्री.हेमंत पाटकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन आणि डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन संपन्न झाले.
यानंतर सल्लागार श्री.डी.पी. तानवडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच आयडियलचे सहाय्यक शिक्षक हेमंत पाटकर सर यांनी वाचन प्रेरणा दिनाविषयी विचार व्यक्त केले, आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करताना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे निमित्ताने विविध विषयावरील तसेच डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते, विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचे वाचन करत वाचनाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाला मान्यवरांसोबत आयडियलच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ वैष्णवी मोरवेकर मॅडम सर्व सहाय्यक शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षिका सौ .शितल बांदल मॅडम यांनी केले