सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचा शिवम पासलेभारतीय सैन्य दलामध्ये निवड
स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय , रामभाऊ परुळेकर ज्युनिअर कॉलेज आणि देशभक्त शंकरराव गवाणकर सायन्स कॉलेज मालवण या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या एनसीसी विभागाचा एनसीसी कॅडेट एफ वाय बी ए या वर्गात शिकत असलेला शिवम दत्तात्रय पासले या विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलामध्ये निवड झाली, सिंधुदुर्ग कॉलेजमधूनतो एनसीसी सी सर्टिफिकेट पास झालेला होता आणि त्याचा त्याला फायदा झाला.
सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम आर खोत, यांचे त्याला मार्गदर्शन लाभले
त्याचबरोबर 58 महाराष्ट्र बटालियन कर्नल दीपक दयाल सुभेदार मेजर दिनेश गेडाम व इतर आर्मी ऑफिसर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर प्रॅक्टिस करून घेण्यात आले
कॉलेजचे प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर सीडीसी अध्यक्ष अडव्होकेट समीर गव्हाणकर, सचिव चंद्रशेखर कुशे इतर सर्व संचालक मंडळ, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कॉलेजचा सर्व प्राध्यापक स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, एनसीसी विभाग या सर्वांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले सगळीकडे गौरव करण्यात येत आहे
कॉलेजला ऍडमिशन घेत असताना त्यांनी ही जिद्द बाळगली होती की मी स का पाटील कॉलेजला आणि एनसीसी मध्ये ऍडमिशन घेत आहे ते फक्त सैन्य दलात भरती होण्यासाठीच तुमच्या कॉलेजला एनसीसी साठी मी आलेलो आहे. मी एक ना एक दिवस इंडियन आर्मी मध्ये भरती होणारच असे त्याने मार्गदर्शक लेफ्टनंट प्राध्यापक खोत सर त्यांना सांगितले एक ना एक दिवस मी तुमच्या कॉलेजवरच्या गेटवर माझा फोटो असेल असे त्याने सांगितले होते. त्याला त्याच्या आई वडिलांची साथ सुद्धा चांगल्या प्रकारे मिळाली.
सिंधुदुर्ग कॉलेजची एनसीसी सातत्याने आघाडीवर आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी आर्मी आणि पोलीस मध्ये भरती करून कॉलेजला आपण एका उंचीवर पोहोचवण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. अशा प्रकारची माहिती एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट प्रा .डॉ एम आर खोत
सिंधुदुर्ग कॉलेज मालवण यांनी दिली