सिनियर नॅशनल क्रिकेट चॅम्पियनशिप अंतर्गत खारेपाटण कॉलेजच्या शाहिद सिराज चोचे याची राष्ट्रीय स्तरावरील संघामध्ये निवड

खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित ज्युनिअर कॉलेज खारेपाटण मधील इयत्ता अकरावी सायन्सचा विद्यार्थी कु. शाहिद सिराज चोचे याची नुकतीच १७ वर्षाखालील टेनिस क्रिकेट सिंधुदुर्ग येथील स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली असून त्याच्या या निवडी बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
खारेपाटण ज्युनिअर कॉलेज चा विद्यार्थी सिराज चोचे याच्या क्रिकेटमधील उत्तम कामगिरीची दखल घेऊन बारामती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संघासाठी त्याची निवड करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्याच्या या क्रिकेटमधील यशाची दखल टेनिस क्रिकेट असोसिएशन,महाराष्ट्र राज्य यांनी घेत त्याची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट संघामध्ये देखील निवड करण्यात आली असून,त्याचे क्रिकेट या खेळामध्ये असणारे प्राविण्य त्याने बारामती येथे तालुकास्तरीय आणि नाशिक येथे राज्यस्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व पदक मिळवून सिद्ध केले आहे.
तसेच कुमार शाहिद सिराज चोचे याची राष्ट्रीय स्तरावरील नेपाळ येथे पार पडणाऱ्या टेनिस क्रिकेट संघामध्ये निवड करण्यात आली आहे. कु. शाहीद हा होतकरू व ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याला सुरुवाती पासूनच क्रिकेट या खेळाची खूप आवड होती. खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याची ही आवड जोपासण्यात प्रशालेतील क्रीडा शिक्षकांनी त्याला सहकार्य केले व प्रोत्साहन दिले. शाहिद हा मध्यमवर्गीय कुटुंबातील होतकरू विद्यार्थी असल्याने त्याला पुढील क्रिकेट या खेळामधील कारकीर्द यशस्वी करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी त्याला मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा कुमार शाहिद व त्याच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केली जात आहे.
त्याच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष- श्री भाऊ राणे,सचिव श्री महेश कोळसुळकर, सहसचिव श्री.राजेंद्र वरुणकर व संस्थेचे सर्वपदाधिकारी ,खारेपाटण प्रशालेचे प्राचार्य श्री.संजय सानप सर, पर्यवेक्षक श्री राऊत सर, सर्व शिक्षकवृंद यांनी त्याचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

Leave a Reply

error: Content is protected !!