वरिष्ठ नेत्यांची गुलामगिरी करणाऱ्या रूपेश पावसकर यांची उपरकर यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही !

सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचे समर्थक दीपक गावडे यांचे टीकास्त्र

प्रतिनिधी, कुडाळ

पहिले राणे समर्थक नंतर मूळ शिवसेना आणि आत्ता शिंदे गट, दर दोन वर्षांनी नवीन पक्षाच्या शोधात फिरणाऱ्या रूपेश पावसकर यांनी सध्याच्या पक्षात आपल्या सोबत कोणी आहेत का? याची चाचपणी करावी. कारण त्यांच्याबाबत त्यांच्याच सध्याच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचे अनेक ऑडिओ व्हायरल होत असतात. केवळ नेत्यांना खुश करण्यासाठी पत्रकबाजी करुन आपले पद टिकवणे, एवढेच त्यांना राजकीय काम आहे. दर दोन वर्षांनी नवा पक्ष शोधत फिरणाऱ्या रुपेश पावसकर यांनी राजकीय जीवनात प्रथम आपले नेमके काय चुकत आहे याचे आत्मपरीक्षण करावे. स्वतःच्याच पक्षात बॅनरवर आपला फोटो पदाधिकाऱ्यांनी लावला नाही म्हणून थयथयाट करणाऱ्या पावस्कारांनी आपली राजकीय पातळी ओळखावी. जिल्हा संघटक म्हणून मिरवतात आणि निवेदन देताना एकटेच फिरतात. मग हे कसली जिल्ह्याची संघटना बांधणार आहेत? फक्त वरिष्ठ नेत्यांची गुलामगिरी करणाऱ्या आणि त्यांची तळी उचलणाऱ्या पावसकर यांनी उपरकर यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही, असा टोला सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांचे समर्थक दीपक गावडे यांनी रूपेश पावसकर यांना लगावला आहे. तर यापुढे उपरकरांवर नाहक टीका कराल तर याद राखा, या पुढची देखील पावसकर यांची कुंडली काढून ठेवू असा सणसणीत इशारा गावडे यांनी पावसकर यांना दिला.

error: Content is protected !!