श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र. २ येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
माजी विद्यार्थ्यांनी साधला स्नेहसंवाद
श्री स्वयंभू विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळा, कणकवली शाळा क्रमांक २ येथे रविवार, १ नोव्हेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांची सभा उत्साहात पार पडली. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेचे दिवस, मित्रांसोबत घालवलेले क्षण आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांची आठवण काढताना उपस्थित विद्यार्थी भावुक झाले.
काळ पुढे गेला, अनेक बदल झाले, प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात रमला; मात्र शाळेची ओढ आणि शालेय जीवनातील गोड आठवणी आजही तितक्याच ताज्या आहेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जुन्या आठवणींना पुन्हा पालवी फुटल्याचा आनंद या स्नेहमेळाव्यातून अनुभवायला मिळाला.
या सभेला चंद्रकांत सखाराम राणे, नगरसेवक स्वप्नील शशिकांत राणे, अनंत गोविंद साटम, चंद्रशेखर रामचंद्र राणे, सखाराम श्रीकृष्ण राणे, तेजस दत्तात्रय राणे, कार्तिक विजय पिळणकर, प्रशांत दिगंबर पिळणकर, मनोज संजय घाडीगावकर, सचिन सूर्यकांत सरंगले, मनोज कृष्णाजी राणे, भिवा वसंत परब, संदीप रामचंद्र राणे, रुपेश रमेश राणे, दीपक वामन सावंत, दशरथ बळीराम परब, महेश आत्माराम मेस्त्री, नितीन हरिश्चंद्र पांचाळ, लक्ष्मण बबली गवंडी, गुरुदास शांताराम ठुकरुल, संतोष परब, संदीप चंद्रकांत उंबळकर, महेश प्रकाश राणे, महेश सदाशिव पिळणकर आणि सत्यवान दत्ताराम परब यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक, सर्व सहकारी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या स्नेहमेळाव्यामुळे जुन्या मित्रांच्या भेटीचा आनंद आणि शाळेशी असलेले ऋणानुबंध पुन्हा एकदा दृढ झाले.





