माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत सरीता पुजारे ठरल्या पैठणीच्या मानकरीसोन्याच्या नथीच्या मानकरी ठरल्या श्रेया संदेश मेस्त्री

सीने अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती
आचरा–अर्जुन बापर्डेकर
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या सौ सरिता योगेश पुजारे तर उपविजेत्या सौ श्रेया संदेश मेस्त्री यांना सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत एकूण साठ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेचा शुभारंभ सुप्रसिद्ध टिव्ही स्टार अक्षता कांबळी यांच्या हस्ते केले गेले. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना स्त्रीयांवरील वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी मुलींना मोबाईल मध्ये न गुंतवतात स्व संरक्षणाचे धडे देवून आत्मनिर्भर बनविण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांच्या सोबत देवस्थान सचिव संतोष मिराशी, देवस्थान समिती सदस्य मंगेश मेस्त्री, विजय कदम,जयप्रकाश परुळेकर, अर्जुन बापर्डेकर, मंदार सांबारी, महादेव मिराशी,सामाजिक कार्यकर्त्यां रश्मी दाभोळकर ,दत्ता वराडकर,परेश सावंत,तेजस्विता केळूस्कर,राजू घाडी ,योगेश बागवे यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे सुत्रसंचलन नागेश नेमळेकर यांनी केले.
फोटो–टिव्ही स्टार अक्षता कांबळी यांचा सन्मान करताना संतोष मिराशी
2) पैठणी विजेत्या सरीता पुजारे सोबत इतर मान्यवर