आमदार वैभव नाईक यांनी निराधारांना दिला प्रशस्त हॉल

पणदूर संविता आश्रमाच्या प्रशस्त हॉलचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

हॉलसाठी दिला होता २५ लाखाचा निधी

        गेली अनेक वर्षे जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून निराधार बांधवांना पणदूर येथील संविता आश्रमात उत्तम प्रकारे  सेवा देण्यात येत आहे. या आश्रमासाठी नवीन इमारतीची आवश्यकता होती. आमदार वैभव नाईक यांच्याकडे याबाबतची मागणी संस्थेने केल्यानंतर त्यांनी ताबडतोब प्रशस्त हॉल बांधण्यासाठी २५ लाखाचा निधी  दिला होता. वर्षभरात या निधीतून प्रशस्त असा हॉल प्रत्यक्षात उभारण्यात आला असून  मंगळवारी या नूतन हॉलचे उदघाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते  करण्यात आले.यावेळी संस्थेच्या वतीने आ.वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.
   यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की, संविता आश्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे निराधार बांधवांना सेवा देण्याचे मोठे काम होत आहे. संस्थेचे अध्यक्ष संदीप परब व त्यांची टिम यासाठी अपार मेहनत घेत आहे. निराधार बांधवांना सोयी सुविधा  मिळाल्या पाहिजेत यासाठी हा  प्रशस्त हॉल बांधण्यात आला असून  त्यामुळे आश्रमाची व्याप्ती आता आणखी वाढणार असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

  यावेळी संस्थेचे अध्यक्ष संदीप परब म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाला विकास प्रक्रियेत आणण्याचे काम आमदार वैभव नाईक करीत आहेत. संविता आश्रमासाठी त्यांचे नेहमी सहकार्य लाभते.निराधार बांधवांना दर्जेदार सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून आमदार वैभव नाईक यांनी २५ लाख रुपये निधी  मंजूर करून दिला. त्यातून आश्रमासाठी प्रशस्त इमारत उभी राहिली. त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून सेवाभावी  कार्य असेच यापुढेही चालू रहावे असे त्यांनी सांगितले. 

    यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय  पडते,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,तालुकाप्रमुख राजन नाईक,माजी उप सभापती जयभारत पालव,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप परब,साबाजी मस्के,आबा सावंत,गौरी साईल,किशोरी जाधव,धोंडी जाधव,प्रताप साईल,राकेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!