काही वेळातच निघणार कणकवलीत आरक्षण बचाव रॅली
शेकडोंच्या संख्येने कणकवलीत महायुतीचे कार्यकर्ते एकवटले
आमदार नितेश राणे करणार रॅलीचे नेतृत्व
महायुतीच्या वतीने आज कणकवलीत जाणवली ब्रिज ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत आरक्षण बचाव रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस हटाव देश बचाव, आरक्षण बचाव, चा नारा देत जानवली ब्रिजवर मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते एकवटले. काही वेळातच ही आरक्षण बचाव रॅली शेकडोंच्या उपस्थितीत उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने निघणार आहे. आमदार नितेश राणे हे या रॅलीचे नेतृत्व करणार असून या रॅली करता भाजपाचे व महायुती चे पदाधिकारी कार्यकर्ते रॅली यशस्वी होण्याकरता प्रयत्न करत आहेत.