निवती समुद्रात बोट बुडाल्या मुळे दोन खलाशांचा मृत्यू

निवती समुद्रातुन मच्छिमारी करुन परत येत असताना निवती येथील मच्छिमार श्री. आनंद धुरी यांची बोट पलटी होऊन दोन खलाश्यांचा मृत्यू झाला आहे. या बोटीमद्धे एकूण 14 खलाशी होते. ही घटना आज शनिवारी 05.10.2024 रोजी मध्यरात्री नंतर दोन वाजण्याच्या सुमारास घडली. निवती सरपंच श्री. अवधूत रेंगे यांना मध्यरात्री ही खबर समजताच ते घटनास्थळी दाखल झाले होते.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, काल शुक्रवारी रात्री 8.30 वाजता निवती येथील मच्छिमार आनंद धुरी यांची बोट एकूण 14 खलश्यांना घेऊन समुद्रात मच्छिमारी करण्यासाठी गेले होते मध्यरात्रीच्या नंतर त्यांनी निवती समुद्राच्या किनारी परतीचा प्रवास करत असताना किनाऱ्यापासून जवळच असलेल्या म्हणजेच ज्या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्रीत येतात त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. समुद्र किनाऱ्यापासून 200 मीटर अंतर असताना ही दुर्घटना घडली आहे. यातील मृत्यू झालेले आनंद पुंडलिक पराडकर वय वर्षे 58 हे श्रीरामवाडी येथील आहेत पराडकर यांचा मृत्यू बोट पलटी होऊन जाळ्यात अडकून राहिल्यामुळे झाला. तर, दुसरे मृत्यू झालेले येरागी खलाशी हे खवणे येथील आहेत त्यांचे वय वर्षे 48 असून हे मृत्यू झालेले दोन्ही खलाशी वेंगुर्ला तालुक्यातील आहेत यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर निवती गावात या घटनेनंतर दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यू झालेल्या खलश्यांचा नोंद निवती पोलीस ठाण्यात नोंद असून त्यांना कुडाळ येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.

*

error: Content is protected !!