गोवळ धनगरवाडी येथील ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपामध्ये

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजप पक्षामध्ये प्रवेश
देवगड मधील गोवळ धनगरवाडी येथील ठाकरे सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
प्रवेश केलेल्यांमध्ये दिनेश कोकरे, संजय कोकरे, सुनील कोकरे, राजेंद्र कोकरे, विंजू जंगले, विष्णू शेळके, तुकाराम कोकरे यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे
आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्याचा जो कायापालट केला आहे. यामध्ये आमचा गोवळ परिसर हवा असेल तर आम्हाला आमदार नितेश राणे यांचे नेतृत्वाखाली काम करावे लागेल हे लक्षात आल्याने आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे असे प्रवेश करताना सांगितले.
यावेळी उपस्थित बंड्या नारकर, सत्यवान जंगले,राजू जठार, गोविंद कोकरे, महेश पडवळ आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
देवगड प्रतिनिधी