हरवलेले तब्बल पाच मोबाईल एका महिन्यात कणकवली पोलिसांनी दिले शोधून परत

कणकवली पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची दमदार कारवाई
मोबाईल मालकांमधून व्यक्त करण्यात आले समाधान
अनेकदा गहाळ होणारे मोबाईल मोबाईलचा शोध घेणाऱ्या पोर्टलचा वापर करून शोधत हे सर्व मोबाईल संबंधित मोबाईल मालकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कणकवली पोलिसांकडून यशस्वीपणे करण्यात आले. तब्बल 1 लाख 8 हजार रुपयांचे किमतीचे मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले. सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल 5 मोबाईल शोधून ते मोबाईल मालकाच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत, पोलीस कॉन्स्टेबल नितीन बनसोडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली. मोबाईल गहाळ झालेल्यांमध्ये स्वप्नाली रावराणे वैभववाडी यांचा मोबाईल भोकर मधून तर हरिश्चंद्र बिडये नांदगाव यांचा मोबाईल रत्नागिरी मधून, आनंद नाईक धुरे यांचा मुबंई मधून, दीपक राणे कणकवली यांचा मोबाईल गोवा येथून व रोहन फोंडके यांचा मोबाईल नांदगाव येथून रिकव्हर करण्यात यश आले. कणकवली पोलिसांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे तसेच या मोबाईल मालकांनी देखील कणकवली पोलिसांच्या कामगिरीबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
दिगंबर वालावलकर /कणकवली