एलसीबी चे पोलीस राजु जामसांडेकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये केले आहे उल्लेखनीय काम

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी राजू जामसांडेकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलात राजू जामसांडेकर हे एक सर्व परिचित नाव असून पोलीस म्हणून रुजू झाल्यानंतर मालवण पोलीस स्टेशन, कणकवली पोलीस स्टेशन, त्यानंतर स्पेशल ब्रांच, वैभववाडी पोलीस स्टेशन व त्यानंतर आता स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागामध्ये ते कार्यरत आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये तपास कामात त्यांचा विशेष हातखंडा राहिला आहे. गुन्ह्याची गोपनीय माहिती काढण्यात राजू जामसांडेकर हे पोलीस दलात विशेष अग्रक्रमाने नाव घेतले जाते. त्यांना मिळालेल्या या बढती बद्दल त्यांचे सर्वच सरातून कौतुक केले जात आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!