योगेश कुवळेकर यांचे निधन

कणकवली,तेलीआळी येथील योगेश सूर्यकांत कुवळेकर (४०) यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,बहिण, भावोजी,काका,काकी,चुलत भाऊ,चुलत बहिणी असा मोठा परिवार आहे. तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा कायमच पुढाकार असे. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे तेलीआळी तसेच कणकवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.शनिवारी सकाळी कणकवली मराठा मंडळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश कुवळेकर हे सामाजिक कार्यकर्ते सचिन कुवळेकर यांचे चुलत बंधू होत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!