आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न.

कणकवली/मयूर ठाकूर

तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघटना यांच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे येथे नुकताच संपन्न झाले
18 वर्षाच्या आतील मुलींना सोशल मीडिया मोबाईल व इतर प्रलोभनांपासून दूर राहून स्वतःला कसे सुरक्षित ठेवले पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन प्रमुख वक्ते कणकवली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री महेश जंगले यांनी केले त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या जाळ्यात मुलींची होणारी फसवणूक व अशी परिस्थिती निर्माण झाल्यास घ्यायची खबरदारी याविषयी ॲडव्होकेट शिंदे मॅडम यांनी मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक श्री महेश जंगले , ॲडव्होकेट शिंदे मॅडम, ॲडव्होकेट कौस्तुभ मर्गज,आचार्य मॅडम ,ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल ,सी.ई.ओ डी.पी तानावडे सर मुख्याध्यापिका सौ.अर्चना देसाई मॅडम इयत्ता आठवी नववीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री.हेमंत पाटकर सर यांनी केले

error: Content is protected !!