असलदे तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी रुपेश खरात बिनविरोध

ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा

पक्ष मतभेद बाजुला ठेवून सहकार्य करा – सरपंच चंद्रकांत डामरे

असलदे तंटामुक्त गाव समितीत अध्यक्षपदी रुपेश खरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच ग्रामसभेत ओटव धरण प्रकल्पातून जाणा-या कालव्यातील पाणी गावातील शेतक-यांना व नागरीकांना उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. हा गाव ओटव धरण प्रकल्प लाभ क्षेत्रात सामावेश करण्याचा एकमुखी ठराव घेण्यात आला . गावातील विविध विकास कामांवर चर्चा खेळीमेळीत पार पडली. तसेच वैयक्तिक लाभांच्या विविध लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या सभेत असलदे गावाच्या विकासासाठी सर्वांनी पक्ष मतभेद बाजुला ठेवून सहकार्य करावे , असे आवाहन सरपंच चंद्रकांत डामरे यांनी केले.
असलदे ग्रामपंचायत श्री. रामेश्वर सभागृहात सरपंच चंद्रकात डामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसरपंच सचिन परब , सोसायटी चेअरमन भगवान लोके, ग्रा.प. सदस्य दयानंद हडकर , विदया आचरेकर , आनंदी खरात , स्वप्ना डामरे, सुवर्णा दळवी , ग्रामसेवक संजय तांबे आदी उपस्थित होते. यावेळी नुवर्निवाचित तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष रुपेश खरात यांचा शाल व पुच्छगुच्छ देवून सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी सत्कार केला. तसेच माजी अध्यक्ष मनोहर खोत यांचा पुच्छगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार इच्छूक होते. त्यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे यांनी गावातील ज्या राहिलेल्या वाडीबाबत ईश्वर चिठ्ठी उडवण्यात यावी. अशी सुचना केली. त्यानुसार असलदे धनगरवाडी या वाडीची चिठ्ठी आल्याने त्या वाडीतून एकमेव रुपेश खरात इच्छूक असल्याने सर्वांमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर संपुर्ण समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष रुपेश खरात , पोलीस पाटील सावित्री पाताडे, सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब , ग्रा.प.सदस्य आनंद तांबे, दयानंद हडकर , आनंदी खरात , विद्या आचरेकर, सुवर्णा दळवी , सपना डामरे, पत्रकार भगवान लोके, वासुदेव दळवी, विठ्ठल खरात , सर्पमित्र गुरुप्रसाद वायंगणकर , मनोहर प्रभूखोत, रघुनाथ लोके, संतोष परब, संजय डगरे , प्रविण डगरे , लक्ष्मण लोके , प्रदिप हरमलकर , महेश लोके , प्रकाश आचरेकर , दिपक तांबे , प्रशांत तांबे, सुनिल तांबे, सुरेश सुतार, परशुराम परब, श्रीकृष्ण परब, पोलीस चंदक्रांत झोरे, ग्रामसेवक संजय तांबे , मुख्याध्यापक शरद कदम आदी सदस्यांची समिती घटीत करण्यात आली.
ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. तसेच गणेश मुर्तीवर रोज विविध ठिकाणी काही समाजकंठकाने दगड फेक करत हिंदू देवतांवर दगडफेक केल्याने त्यांचा निषेधाचा ठराव घेण्यात आला. डोंगरी विकास योजने अंतर्गत असलदे उगवतीवाडी व डामरेवाडी या दोन वाडीतील ररस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण कामासाठी निधी मंजुर केल्याबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण , खा. नारायण राणे , आ. नितेश राणे यांचा आभार ठराव घेण्यात आला. या सभेत समाज कल्याण विभागाच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या डेस्क बेंच संदर्भात चर्चा करण्यात आली.
पोलीस पाटील सावित्री पाताडे , माजी सरपंच सुरेश लोके , पत्रकार नरेंद्र हडकर, माजी तंटामुक्त अध्यक्ष मनोहर खोत , परशुराम परब , रघुनाथ लोके , प्रशांत परब , संतोष परब , पोलीस दीपेश तांबे, कृषी सहाय्यक प्रमिला तांबे , अनिल नरे , विजय आचरेकर, प्रशांत लोके , सत्यवान लोके , सतिश पोकळे , प्रशांत तांबे , विजय खरात, विजय डामरे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!