शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांना पितृशोक

आज सायंकाळी होणार अंत्यसंस्कार

कणकवली तालुका शिवसेना तालुकाप्रमुख यांचे वडील व वागदे येथील शासकीय दूध डेअरीचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर देऊ परुळेकर (कणकवली गागोवाडी वय 79) यांचे आज दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. कणकवलीतील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी 6 वाजता येथील स्मशानभूमी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!