सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात वाढ झाल्याबद्दल वागदे सरपंच संदीप सावंत यांनी व्यक्त केले आभार!

सरपंच, उपसरपंच यांच्याकडून समाधान व्यक्त

राज्य शासनाने राज्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात भरीव वाढ केली असून हा निर्णय हा निश्चितपणे सरपंच उपर सरपंचांना दिलासादायक ठरणार आहे. या निर्णयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंचांच्या वतीने वागदे सरपंच संदीप सावंत यांनी राज्य शासनाचे विशेष आभार मानले आहेत. सरपंच, उपसरपंच यांना शासकीय कामानिमित्त जिल्हा तालुकास्तरावर अनेकदा फेऱ्या मारावा लागतात. एकदा जाऊन होत नसलेली कामे वारंवार पाठपुरावा करण्यासाठी जाऊन ती मार्गी लावावी लागतात. अशा स्थितीत सरपंचांना येणारा प्रवास खर्च किंवा अन्य बाबींवर होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणावर असतो. मात्र त्या तुलनेत सरपंचांना मिळणारे मानधन हे अत्यल्प होते. याबाबत राज्य शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे सरपंचांना केलेल्या कामाची पोचपावती असल्याचे मत श्री सावंत यांनी व्यक्त केले. याबद्दल शासनाचे त्यांनी पुन्हा एकदा आभार मानले आहेत.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!