वायंगणतड अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना दीपक केसरकरांकडून आर्थिक मदत

वायंगणतड येथे बोलेरो पिकअपने दुचाकीला ठोकरल्याने संतोष मधुकर शेटकर (घोटगेवाडी ) व आनमारी मिंगेल सोज (तिलारी )यांचा मंगळवारी (ता. १७) मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी तातडीची आर्थिक मदत दिली.
यावेळी तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, सावंतवाडीचे माजी नगरसेवक राजन पोकळे, उपज़िल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, प्रेमानंद देसाई,गोपाळ गवस , भगवान गवस, विनायक शेट्ये, रत्नकांत कर्पे, ज्ञानेश्वर शेटवे, कांता गोवेकर, मायकल लोबो, मिनिन फर्नांडिस, मार्शल फर्नांडिस, सकरू लोबो, ब्रिन डायस, सुनील शेट्ये,राघोबा शेटकर,प्रेमनाथ कदम, राजू देसाई, सुभाष शेटकर बाबली दळवी, बाळकृष्ण मणेरीकर, संदीप तुळसकर आदी दोन्ही गावचेवेळ ग्रामस्थ, मृतांचे कुटुंबीय व शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!