जलजीवन मिशन अंतर्गत माईण नळ योजना कामाचा रामदास विखाळे यांचा मक्ता रद्द

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कारवाई

विहिरीची जागा बदलून देखील काम विहित कालावधी सुरू केले नसल्याने शिफारस

जलजीवन मिशन अंतर्गत माईण नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती करणे या कामाचा मक्ता रामदास विखाळे या ठेकेदारांच्या नावाने मंजूर होता. मात्र हे काम विहित कालावधीत पूर्ण न केल्याने या कामाचा रामदास विखाळे यांच्याकडील मक्ता मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी रद्द केला आहे. या आदेशात त्यांनी म्हटले आहे जल जीवन मिशन अंतर्गत मौजे माईण नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती करणे, ता. कणकवली, अंदाजपत्रकीय रक्कम रू. 8087600/- व निविदा रक्कम 6493970/- आहे. सदर काम श्री. रामदास वसंत विखाळे, ता. कणकवली यांचे नावे -0.54 टक्के कमी दराने मंजूर आहे. सदर कामास कार्यारंभ आदेश दिनांक 29/09/2022 रोजी देणेत आली असून करारनामा अट-शर्तीनूसार काम पूर्ण करणेची विहित मुदत दिनांक 30/09/2023 पर्यंत होती. कार्यारंभ आदेशातील अटी-शर्तीनूसार काम पूर्ण करणेसाठी दिलेली विहित मुदत संपलेली आहे.
सदर कामाची बी-1 निविदेच्या अटी-शर्तीमधील खंड 2 नुसार कामाची प्रगती राखलेली नाही. परीणामी या भागातील जनतेस पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यानुसार सदर मक्तेदारवर जबाबदारी निश्चित करणेकामी उपअभियंता (ग्रा.पा.पु.) उपविभाग कणकवली जा.क्र./ उपअभिं/गापापु/217/2024 दिनांक 18/06/2024 रोजीची यांची शिफारस विचारात घेऊन बी 1 निविदेच्या अटी-शर्तीमधील बाब क्रमांक 19 मधील कंत्राटदारांची 1961 च्या अॅप्रोटिस अॅक्टप्रमाणे तसेच त्या अन्वये वेळोवेळी निघालेल्या आदेशाचे पालन करण्याची जबाबदारी राहील असे. करण्यास तो अपात्र ठरल्यामुळे कामाचा रामदास वसंत विखाळे, कणकवली यांचे नावे असलेला मक्ता रदद करणेस या आदेशान्वये मान्यता देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान याबाबत श्री विखाळे यांना दिलेल्या पत्रात उपअभियंता यांनी म्हटले आहे की माईन गावठाण वाडी येथे नवीन उद्भव घेऊन त्यावरून गावाला नळ योजना करणे मंजूर होते परंतु विहिरीची जागा ही नदी शेजारी असल्याने व अति कठीण दगड असल्याने तसेच नदी बारमाही वाहत असल्याने पुढे येणाऱ्या अडचणींचा विचार करून ग्रामपंचायत माईन यांनी 3 जानेवारी 2024 च्या ग्रामसभा ठरावानुसार सदर ठिकाणी विहीर न बांधता तांबेवाडी येथील जुन्या सार्वजनिक विहिरीवरून नळ योजना करण्याचे ठरले होते मात्र सदर कामाची मुदत संपूर्ण ही सदर काम सुरू केले नाही ही बाब गंभीर असल्याने सदर कामाचा मक्ता रद्द करण्याची शिफारस उपअभियंता यांनी या पत्राद्वारे कार्यकारी अभियंता यांना केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हा मक्ता रद्द करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान याबाबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांची संपर्क साधला असता त्यांनी वरील पत्र व्यवहारांना दुजोरा दिला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!