त्रिंबक येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आचरा–अर्जुन त्रिंबक येथील आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत आणि अंकुर हॉस्पिटल मालवण यांच्यामार्फत
हार्मोनि मेडिकेअर त्रिंबक डॉ सिद्धू सकपाळ यांच्या हाॅस्पिटलमध्ये
मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात
कार्डिओग्राम काढणे व मार्गदर्शन करणे हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरात हृदयरोग तज्ञ डॉ मालविका झाट्ये यांनी तर बालरोग तज्ञ डॉक्टर अमोल झाट्ये यांनी तपासणी केली.तसेच रक्त तपासणीही केली गेली.शिबीर यशस्वीतेसाठी डॉ सिद्धू सकपाळ यांनी विशेष मेहनत घेतली.