कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2024 या होणा-या स्पर्धेसाठी सिंधुदुर्गतील दोन पंचांची निवड

राज्य पंच अमित गंगावणे व राष्ट्रीय पंच जयेश परब यांची पंचपदी नियुक्ती
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने सांगली येथे होणाऱ्या ५१ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2024 या होणा-या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील राज्य पंच अमित गंगावणे व वेंगुर्ला तालुक्यातील राष्ट्रीय पंच जयेश परब यांची पंचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे यापूर्वी देखील त्यांनी पंच म्हणून काम केले होते.